लेख

" प्रवास "

श्री दुंदा मोरे

आपणास विश्वास बसत नसतो कि एखादा दिवस हा निश्चितच फार मोठा बदल घडून आणण्यास कारणीभूत ठरतो . नाहीना विश्वास बसत...बघा....

जानेवारी १९८५ चा दिवस डॉ.गोविंद गारे साहेबांनी त्यांच्या ऑफिसवर कार्यकर्त्यांची एक मीटिंग बोलाविली होती.मिटिंगचा विषय होता “समाजाची एक पतसंस्था स्थापन करणे”. प्रतापराव देशमुख ह्यांचे नेतृत्वाखाली पतसंस्थेची उभारणी करण्याचे निश्चित झाले व त्वरित कामाला सुरुवात करण्याचे निश्चित झाले.

पुण्यातील सर्व विभागाची माहिती त्या त्या भागातील कार्यकर्त्यामाफत मिळविण्यात आली.हा हा म्हणता प्रतापराव देशमुख व सहकार्यांनी पुण्याचा कानाकोपरा पिंजून काढला व २४ मार्च ला १९८६ रोजी पतसंस्थेची स्थापना झाली.हीच संस्था सध्या कार्यरत आहे .

हाच विश्वास व अभ्यास पुढेही उपयोगी आणायचा आणि तो आला हि.सामाजिक कार्यासाठी आदिवासी समाज कृती समितीची स्थापना झाली निमित्त होते “बोगस आदिवासींची शासकीय सेवेतील संख्या” . पुण्याच्या वेगवेगळ्या विभागातील समाजाचा विचार करणारी विविध शेत्रातील मंडळीचा समावेश असलेली व मुख्य हेतू मागे वळून पहा असणारी कार्यकर्त्यांची टीम शिताराम जोशीच्या अध्यक्षेतेखाली काम करू लागली.

पाहता पाहता २५ वर्षाचा कार्यकाल कडी उलटून गेला कळलेहि नाही. काय काम केले ह्याचा विचार करत गेलो तर अनेक प्रसंग समोर दिसू लागले.अखंड पुणे व नगर जिल्ह्याचा आदिवासी भाग पिंजून काढला. अडचणी अनेक दिसू लागल्या आणि लक्ष तर द्यावे लागणार मग सुरुवात करावयाची कोठून ह्यावर चर्चा सुरु झालि व जसे जमेल तसे चालत राहिलो.मग कुठे धन्य वाटप,कपडे वाटप,आरोग्य शिबीर असे विविध कार्यक्रम चालू झाले.समाजासमोरील अडचणी संपता संपेना.पण ण थांबता काम करतच राहिली .

मधेच कातकरी समाजाचा सर्वे आप्पा शिंगाडे यांनी हातात घेतला व लक्षात आले कि आपल्या समाजापेक्षा कातकरी समाजासमोर अडचणीचा डोंगर खूपच मोठा आहे. कातकरी समाजाची देशात ओळख देखील नाही.मग सुरुवात झाली रेशनीगचे कार्ड काढण्यापासून त्या नंतर कातकरी समाजातील काही कार्यकर्ते हेरून त्यांना प्रवाहात आणले व त्यांचा एक गट कार्यारट झाला.आता घरकुल,मच्चीमारीसाठी जाळी अशे विविध मार्गाने कातकरी समाजासाठीचे काम चालू आहे.पूर्वी आदिवासी भागातील वैद्यकीय सुविधांचा विचार केला तर जास्तीत जास्त रुग्नाना मोठ्या आजारासाठी पुण्याशिवाय पर्याय नसे आणि जेव्हा तो रुग्ण उपचारासाठी पुण्यात आणला जात असे तेव्हा त्याची प्रकृतीही आतिशय खालावलेली असायची.मग त्यातील बहुतांशी रुग्ण हे दगावत पण त्यांचा मृतदेह आदिवासी भागात नेणे हि मोठ्या जिकिरीची बाब असे.त्याचा विचार करून संस्थेने रुग्णवाहिका सेवा आदिवासींसाठी सुरु केली. सध्याच्या युगात माणूस किवा एखाद्या कुटुंबाचा शोध शहरत घेणे आतिशय सोपे झालेले आहे.पण २० वर्षापूर्वी नोकरीनिमित्त शहरात स्थाईक झालेले कुटुंब हे फार कमी प्रमाणात एकमेकांचे संपर्कात येत.त्यामुळे मुला-मुलींची लग्न जमवणे हि अडचणीचे होऊ लागले व हाच विचार घेऊन प्रेरणा वधु-वर सूचक मंडळाची स्थापना झाली.आजही महिला विभाग हे कार्य आविरत करत आहे.

सिताराम जोशीची टिम ही बहुतांशी विविध वस्तीगुहात राहून शिक्षण घेतलेली टिम त्यामुळे शिक्षणाची आस्था हि मूळतः त्यांच्यात जास्त होती आणि त्यासाठी त्यांचे मान नेहमी स्वताचे शिक्षण कसे झाले,काय अडचणी आल्या या विषयावर चर्चा करायची.पण नेमके काय करायचे कारण त्यासाठी विविध विभागांची गरज होती व नेमके असे लक्षात आले कि आदिवासी आश्रम शाळा आसो कि अन्य शाळा विद्यार्थी हे इंग्रजी , गणित,व शास्त्र ह्या विषयात आनुर्तीन्न होतात.पर्यायाने त्यांचे शैक्षणिक जीवन येथेच संपते व मग जर आसे असेल तर पण शैक्षणिक बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि एकदा एक गोस्ट निश्चित केले कि टिम ते केल्याशिवाय थांबत नसे.मग सुरु झाला इग्रजी,गणित,शास्त्र या विषयांच्या कार्यशाळेचे प्रवास आणि हा प्रवास निरंतर चालू आहे आणि हा सर्वात जास्त समाधान टिम ला शिक्षणात मिळू लागले.कालान्रूप बदल करत हि टिम शिक्षण शेत्रात काम करत आहे .

जसे एखाद्या कुटुंबावर सुखाबारोबेर दुखाचे प्रसंग येतात व त्या प्रसंगातून सुद्ध कुटुंब सावरते व पुन्हा नित्याच्याकामाला लागते तसेच संस्थेचेही झाले.संस्थेचे खांदे कार्यकर्ते तशेच मार्गदर्शक असलेले आसे प्रतापराव देशमूख,आप्पा शिंगाडे व नंतर डॉ.गोविंद गारे आशा महान विभूक्तींच्या निधनाने संस्थेची टिम वेळोवेळी निराश झाली पण पुन्हा नव्या जोमाने आपले कार्य करत राहिली.

ज्या क्षेत्रावर आपण लक्ष केंद्रित करतो तेथे प्रोसहान देणे देखिल गरजेचे असते म्हणून सुरवातीचे काळात फक्त पुणे आणि पिंपरी-चिचवड शहरापुर्ते मर्यादित असणारे विद्यार्थी पुरस्काराची व्याप्ती पुणे व नगर जिल्ह्यासाठी सुरु करण्यात आली. त्याला जोड म्हणून टीमने रोख बक्षिसे देखील सुरु केली व म्हणता म्हणता विद्यार्त्यांची संख्या वाढू लागली.मग त्यात पुन्हा भर पडली व श्री.रामचंद्र शेळकंदे ह्यांनी शिक्षकांसाठी तर श्री.नामदेव गंभिरे यांनी आकोले तालुक्यातील आश्रम शाळेसाठी पुरस्कार जाहीर केले व जिथे कमी तिथे आम्ही हि युक्ती खरी केली.

काळनुरूप समाजात बदल घडत गेले.विविध विषयावर काम करणेसाठी विविध संघटना उभ्या राहिल्या.त्यांच्या हाकेला ओ देणारी पण स्वताचे कार्य आविरत चालू ठेवणारी शिताराम जोशींची टिम आपले शैक्षणिक कार्य मात्र करताच राहिली व करत राहील.

सलग २७-२८ वर्ष काम करणाऱ्या टिम मध्ये आता काही शिलेदार वयाची साठी ओलांडून गेले तर काही साठीच्या जवळ पोहोचले आहेत.आता टिम ला गरज आहे नवीन शिलेदार पुढे पाठविण्याची आणि त्यांना मार्गदर्शन करत खर्या आर्थांर नवीन सुशिक्षित समाज घडविण्याची .

हे सर्व करत असतानाहि वेगवेगळे शेत्रातील दानशूर व्यक्ती तसेच संस्थांनी टिम ला योगदान दिले कारण त्यांच्या योगदानाशिवाय हे सर्व होऊ शक्य नव्हते. त्यामुळे त्या सर्वांचे ऋणात राहण्याचे संस्थेची , टिम इच्छा आहे.



 नामदेव गंभिरे