आदिवासी समाज कृती समिती विषयी

आदिवासी समाज कृती समितीची स्थापना ८ जून १९८८ रोजी संस्था नोंदणी अधिनियम १८६० (सन १८६० चा अधिनियम २१) अन्वये सहाय्यक निबंधक पुणे विभाग , पुणे यांचे कडे झाली.

तसेच मुंबई सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५० (सन १९५० चा मुंबई अधिनियम क्र. २९) अन्वये धर्मदाय उपआयुक्त , पुणे विभाग, पुणे, यांचेकडे २३ मार्च १९८८ रोजी संस्थेची नोंदणी झाली.

संस्था सन ९८८ पासून पुणे व नगर जिल्हयातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, अकोले या तालुक्यातील आदिवासी मधील कोळी महादेव,ठाकर,कातकरी या जमातीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवून संस्था ३० वर्षापासून आदिवासींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत आहे.

आदिवासी समाजातील घुसखोरीस पायबंद घालण्यासाठी तसेच बोगस आदिवासी विरूद्ध लढा देणे, आदिवासींना त्यांचे शैक्षणिक व नोकरीविषयक हक्क मिळवून देणे या ध्येयाने प्रेरित होऊन कै.गोविंद गारे यांच्या मार्गदर्शनाने सन १९८८ मध्ये पुणे शहरातील समाज कार्यात सक्रीय असणार्या कै.प्रतापराव देशमुख, कै. आर.आर. बांबळे, कै. रामचंद्र मांडवे, कै. दामोदर शिंगाडे, श्री. मोतीराम भालचिम, श्री. एस. के. गवारी, श्री. सीताराम जोशी, श्री. मुरलीधर जोशी, श्री. डी. बी. घोडे, श्री. प्रकाश केंगले, श्री. भीमसेन भलचीम, श्री. भागुजी आंभेरे, श्री. ज्ञानेश्वर शेळकंदे, श्री. हरिभाऊ तळपे, श्री. विठ्ठल साबळे, श्री. नारायण मोसे, श्री रघुनाथ कोथेरे, श्री चंद्रकांत वाजे यांनी पुढाकार घेऊन तसेच अदिवासी समाजातील इतर व्यक्तींनी सुद्धा सहकार्य करून हि संस्था स्थापन केली.

सुरुवातीस बोगस आदिवासी विरुद्ध न्यायालयीन लढे हे महत्वाचे कामाचे स्वरूप होते. त्यानंतर कृती समितीने शैक्षणिक व सामाजिक कार्य विस्तारित केले. आदिवासी समाज कृती समितीने समाजात जनजागृती व्हावी म्हणून महिला प्रभोधन शिबीर, पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत सदस्यासाठी कार्यशाळा, वनाधिकार कायदा, माहिती अधिकार कायदा व पेसा कायद्यावर कार्यशाळा आयोजित करून सामाजिक काम केल आहे. आदर्श आश्रमशाळा शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट आश्रमशाळा पुरस्कार, शिक्षक कार्यशाळा, विद्याथी कार्यशाळा, आरोग्य तपासणी शिबिरे, गुणवंत आदिवासी विद्याथी सत्कार, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, आदिवासी युवती प्रबिधन कार्यशाळा,प्राथमिक शिक्षकासाठी इंग्रजी व गणित विषयाची कार्यशाळा, गुणवत्ता सुधार कार्यक्रम , शैक्षणिक धोरण कार्यशाळा अशा प्रकारचे उपक्रम जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, अकोले या तालुक्यात समितीने राबवले आहेत.

आदिवासी समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक , राजकीय, इ. क्षेत्रात कार्य करणाऱ्या कै.गोविंद गारे , श्री मधुकर पिचड , श्री वाहरूदादा सोनावणे, नजुबाई गावित, श्री मनोहरराव देशमुख , श्री पांडुरंग बाबा गांगड यांना आदिवासी भूषण पुरस्कार देऊन समितीने गौरवले आहे.

संस्थेचे संचालक हे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रीय आहेत त्यांची सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष श्री. सीताराम जोशी, कार्याध्यक्ष श्री नामदेव गंभिरे , उपाध्यक्ष श्री खेवजी भोईर , श्री एकनाथ बुरसे , संचालक श्री किसन भोजने व श्री लक्ष्मण भालेकर यांना वेगवेगळ्या संस्थाकडून आदिवासी भागातील सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार मिळालेले आहेत.