प्रोत्साहन पुरस्कार

संस्थेतर्फे दिले जाणारे प्रोत्साहनपर पुरस्कार

संस्थेतर्फे आदिवासी समाजात काम करणारे व्यक्ती, विद्यार्थी, शिक्षक ह्यांचेसाठी विविध पुरस्कार नियमित केलेले आहेत.



गुणवंत विद्यार्थी पुरस्कार

पुणे व नगर जिल्ह्यातील इ. १० वी चे आदिवासी विध्यार्थी मधून गुणानुक्रमे उत्तीर्ण विध्यार्त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. ह्यामध्ये रोख रु. ३,०००/-, रु, २,०००/-, व रु. १,०००/- स्मृतीचिन्ह तसेच इ १२ वी मध्ये प्रत्येक शाखेत प्रथम आलेले विध्यार्थीस प्रत्येकि रु. ३,०००/- व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात येते. तसेच, पुणे शहर आदिवासी नागरी सहकारी पतसंस्थेचे संयुक्त विद्यमाने शहरातील इ १० वी व १२ वी चे विद्यात्यांना विविध विषयांची रोख पारितोषिके तसेच सन्मानाचा “ स्वर्गीय प्रतापराव देशमुख” स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.



वर्ष विध्यार्थी
२०१६-२०१७ रोशनी सीताराम मेमाणे
रमेश हरीभाऊ धनकुटे
२०१५-२०१६ निखिल संतोष बाबळे
हृतिक दिलीप बामळे
कोमल तानाजी लांडे
तुषार लंकानाथ गाभाले
२०१४-२०१५ हृषीकेश दिलीप पारधी
२०१३-२०१४ निकिता रघुनाथ भालचीम
२०१२-२०१३ निशा गुणवंत काटे


गुणवंत शिक्षक पुरस्कार

पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागात शिक्षणाचे योगदान देत असलेले शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शिक्षकी पेशातून निवृत्त झालेल्या स्व. तुकाराम शेलकदे गुरुजी, ह्यांचे स्मृतीप्रीत्यर्थ श्री. रामचंद्र तुकाराम शेल्कांडे ह्यांच्या तर्फे हा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शाळामधून ज्या शाळेचा निकाल १००% लागतो अश्या शाळेच्या इ १० वी चे वर्गाशिक्षकास रु. ५०००/- व स्मृती चिन्ह , श्रीफळ देऊन गौरवण्यात येते.

वर्ष नाव शाळा
२०१२-२०१३ श्री भुजबळ सर शासकीय आश्रमशाळा खिरेश्वर, ता. जुन्नर, जि. पुणे
२०१३-२०१४ श्री ठोबळे सर दया नदा विद्यलय, गोद्रे


उत्कृष्ट आश्रमशाळा पुरस्कार

आश्रम शाळेत घेतलेले शिक्षण व त्याला वडिलांनी दिलेले पाठबळ आणि आशिर्वाद ह्याचा विचार करून उच्च शिक्षित झालेले श्री नामदेव गंभिरे ह्यांना आपले वडिलांचे स्मृतीप्रीत्यर्थ स्वर्गीय देवराम गंभिरे उत्कृष्ठ आश्रम शाळा पुरस्कार २०१२ पासून सुरु केला आहे. ह्या पुरस्काराचे स्वरूप रु. ११०००/- रोख व स्मृती चिन्ह , श्रीफळ असा असतो. ज्या आश्रम शाळेचा निकाल १००% लागतो अश्या आश्रम शाळेस हा पुरस्कार देण्यात येतो.

वर्ष आश्रमशाळा
२०१२-२०१३ शासकीय आश्रमशाळा, कोहाणे, ता. अकोले, जि. अहमदनगर
२०१४-२०१५ शासकीय आश्रमशाळा, शेंडी, ता. अकोले, जि. अहमदनगर
२०१५-२०१६ शासकीय आश्रमशाळा, राजूर (इंग्रजी मेडीयम), ता. अकोले, जि. अहमदनगर