कोणत्याही समाजाच्या खर्या अर्थाने शैक्षणिक, सामाजिक व राजकीय विकास करावयाचा झाल्यास त्या समाजाची संघटनात्मक बांधणी असावी लागते . जोपर्यंत समाज एक होत नाही, तोपर्यंत त्या समाजाचा उद्धार होणार नाही हे निच्षित . याकरिता त्या समाजाचा कट्टर अभिमान, देशनिष्ठा असावी लागते. वयक्तिक स्वार्थात गुरफटलेला फारशी प्रगती करीत नाही.तसेच एकता दुकटा कुणीही सामाजिक प्रगती करू शकणार नाही.म्हणून समाज कदीच एकत्र होणार नाही . जोपर्यंत त्यास चांगले नेतृत्व लाभणार नाही. म्हनून समाजासाठी रात्रंदिवस झपाटलेल्या व्यक्ती आणि संघ यांची सामुहिक जबाबदारी म्हणजेच संघटना आणि एकदा संघटन झाले कि , विजयाची खात्री झाली म्हणून समजा .
शिका , संघटीत व्हा, आणि संघर्ष करा हि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची त्रिसूत्री कोणत्याही समाज्याच्या स्तापनासाठी आताशी पहिली व कदाचीत शिक्षणाची दुसरी पिढी शिक्षण घेऊ लागली आहे . स्वातंत्र्य पूर्व भारतात वर्ण व्यवस्थेशी झगटताना अनेक जाती –जमाती बळी पडली होती. त्याची घडी कायद्याच्या चोकटीत बसविण्याचे काम राज्याघाटनेच्या द्वारे एकता , समानता व बंधुत्वाची स्तापना करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे .आपल्याला घटनेने दिलेले अधिकार व कार्त्यावायची जान असणे आवश्यक आहे. आजही हा समाज अत्यंत भरकटलेल्या अवास्तेत आहे. या समाजामध्ये जाती – जमाती मध्ये भडने लावण्याचे काम काही राजकीय पक्ष व त्यांचे नेते करत आहेत . ज्या समाजात महात्मा जोतीबा फुले , छत्रपती शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या विकासासाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य वेचले . छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सत्तेत सहभागी करून स्वराज्याची मुहुर्त्मेढ रोवली , त्या हिंदुस्तानात आता जाती –जातीच्या नावाने समाजात दरी निर्माण करण्याचे काम प्र्यान्त्नापुर्वक केले जात आहे . आज जातीयात तशी कोणी मनात नाही , कारण जागतिक बदलामुळे सर्व जगाच एकत्र आले. तंत्राण्यानाची अफाट प्रगती झाली आहे . शेती व शिक्षणात मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आहे . लोक संघटीत होत आले. लोकांची आर्थिक परीस्थिती व राहणीमान उंचावलेले आहे. परंतु समाजातील काही लोकांची व नेत्यांची संकुचित वृत्ती आपल्याला भूतकालीन सामाज् सुधकरांचे वयक्तिक भांडवल करून त्या त्या समाजात त्यांचे राजकारण राहिले आहेत.
ज्या आदिवासी समाजाने वरील सर्वांच्या आधी या देशाच्या रक्षणाकरिता रक्त सांडवले आहे, त्या आदिवशी समाजाची इतिहासाने फारशी दाखल घेतली नाही. आदिवासींची वेगळी भाषा , संस्कृती,राज्य नव्हे तर त्यांची स्वातंत्र्य आशी चलन व्यवस्था होती.त्याचा कुठेही नामोल्लेख होताना दिसून येत नाही.या समाजाचा अशिक्षित पना , बुजरेपणा , मितभाषी, काळे, उघडा-नागडा अशी त्याची अहवेलना करून कायमच त्यांना दुय्यम दर्जाचे स्थान दिले आहे. अश्या परिस्थितीत या समाजाला कुणीही ग्वाडफादर राहिलेला नाही . कुणी निर्माण होत नाही, कुणी निर्माण होण्याचा प्रयत्न केला तर त्याची जागा दाकविण्यात येते. आशा असाह्यन्सामाजाने कुणाच्या भरवशावर प्रगतीच्या रथावर आरूढ व्हावे, हा सतावणारा प्रश्न आहे.
पूर्वीप्रमाणे आजही आपला समाज दुर्गम अश्या दोगरामध्ये राहतो. शह्रापासून दूर अंतरावर राहत असल्यामुळे त्याचे जीवनमान फक्त जल , जंगल आणि जमिनीवरच अवलंबून आहे. ज्यांच्यावर पूर्वी त्यांचे मालकी होती . त्याचे साव्रक्षण आणि संवर्धन तो करीत असे . परंतु ब्रिटीश सरकारने जंगल कायदे आणले आणि ते आज आदिवासीच्या विनशाचे कारण ठरत आहे . ना जालावर अधिकार , ना वनावर ! आता तर राहिलेला जमिनीही धन दाडग्याने बळकावलेल्या आहेत . अश्या परिस्थितीत समजाचा विकास कसा होईल? आहे त्या परिस्थितीतही त्याचा कोणावरही रोष नाही किवा कोणताही संघर्ष नाही . परंतु तुम्ही आमचाच जागेत धारण भांधून आमचाच आयुष्याचे मरण वोढून आणलेले आहे . आम्ही धारण परिसरात राहतो, वर्षभर शेतीला तर सोडा परंतु पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष आमच्यासमोर उभे आहे.शेकडो किलोमेटर अंतरावर कॅनॉल च्या साह्याने पाणी वाहून नेऊन मोठ्या प्रमाणात खर्च करून शासन प्रशापितांच्या उसाचे माले फुलवत आहे . परंतु आदिवासीना साधे पिण्याचे पाही देऊ शकत नाही , ते शासन कसले ? आदिवशी कुटुंबामध्ये जी व्यक्ती शिकते त्यास त्याचा संपूर्ण घरादाराचे , त्याचबरोबर आई-वडील , भाऊ-बहिण , काका, मामा-मावशी अश्या सर्व नातेवाईकांची जबाबदारी पार पडावी लागते . ते आयुष्यभर निभावता-निभावता निवृत्ती येते . आणि पुन्हा त्याचे रवानगी जंगलात होते.अश्या वेगवेगळ्या जबाबदारऱ्या पेलवत असताना तो काही अंशी घराचे नेतृत्व करत . परंतु समाजाचे नेतृत्व करण्याचे संघटन कौशल्य त्याच्याकडे नसते . ना सत्ता ना पैसा ! अशी अवस्था असलेला समाज कुटवर मोहमायी जगामध्ये तग धरेल त्याची खात्री देता येत नाही . महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर , लोकमान्य टिळक , छत्रपती शिवाजी महाराज यांची विभागणी त्या त्या समाजाने करून घेतलेली आहे. इतकेच नव्हेत तर देव आणि देवतेही स्वार्थी लोकांनी आपापसाथ वाटून घेतलेली आहेत. मग आदिवासी समाजाने कोणाच्या खांद्यावर हात टेकावे , कोणाच्या हातात हात द्यावा कि , जो नि:स्वार्थीपणे त्यांचे सोबत करेल. असे अंध:कारी वास्तव असले तरी आदिवासी माणसाचे जगण्याचे व जीवनाकडे बगण्याची दृस्ठी सकारात्मक आहे . आज ना उद्या हा समाज अंधारातून प्रकाशाकडे गेल्याशिवाय राहणार नाही . आदिवाशीचे संस्कृती हि निसर्गाशी जुळणारे संस्कृती आहे . त्यामुळे निसर्गावर जे घाले होत आहेत ते त्या समाजावर होत नसून पूर्ण मनुष्य – प्राण्यांवर होत आहेत याची जाणीव प्रस्थापितांनी ठेवण्याची गरज आहे.
आदिवासी समाजात एकूण ४५ जाती व त्याच्या उपजाती आहेत . हाताच्या बोटावर मोजण्या इतपत समाजातील मुले शिकली आहेत . त्यात फक्त १०% मुले पदवीधर व उच्च पदवीधर आहेत . ५०% जास्त मुले - मुली १० व १२वि च्या आतच शिक्षणाला पारखी होत आहेत . मुलींच्या शिक्षणाविषयी नबोललेलेच बरे ! इतकी दयनीय अवस्था आहे . स्वताच्या शेषणिक संस्था , उद्याग्धंडी असणारी उदाहरणे फारच कमी आहेत . राजकीय नेतृत्व हि एवढे परीपाक्क नाही . त्यामुळे सर्वच शेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर्यांचा बक्लोग आहे . त्याचे कारण ज्यांच्याकडून समाज्याच्या फार अपेक्षा असणारा वर्ग मागे वळून पाहत नाही आणि इथेच खरतर समाजाची प्रगती होणे ऐवजी अधोगती होत असल्याचे दिसून येत आहे. समाजाच्या या मानसिक दुबळेपणाचा फायदा इतर प्रगत समाजातील जाती घरत असल्याचे दिसून येत आहे. नजीकच्या काळात इतर समाजातील अनेक जाती अनुशुचीत जमातीमध्ये सामाविस्थ करण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना आपण पाहत आहोत.आदिवासी म्हणून कोणतेही निकष पूर्ण करत नसताना डॉ.बाबासाहेबांची स्पेलिंग मिस्टक झाली असल्याचे भासून धानदात खोटारडे आणि गालीच्च राजकारण काही सत्तापिपासू व लालची राजकारणी मताच्या भिकेसाठी घटना बदलावयास चाललेल्या राजकारणाचे किवा आल्यावाचून राहत नाही . गेल्या अनेक वर्षात सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार आदिवासीनच्या सरकारी नोकरीतील जागा बाल्कावणाऱ्या बोगस आदिवासी आम्ही पाहत आहोत , हे फायदे घेत असताना या बंडगुळाचे नाळ आदिवशी समाजाचे जुळले आहे का ? एका कार्यालयात काम करत असताना त्यांना आदिवासीचे दु;खे , आदिवासीचे संघर्ष व आदिवासी सुख याकरिता कधी एकत्र आलेत का ? त्याचे उत्तर नाही आसे असून त्यांना आदिवासी समाजाचे काहीही देन – घेण लागत नाही . फक्त ह्या मंडळीना आदिवासीच्या सवलती लाटावयाचे आहेत. म्हणून त्यांचे मनसुबे धुळीला मिळवायचे आस्तिल तर संघटनांची मजबूत बांधणी करून एक पावरफुल सत्ता निर्माण केल्याशिवाय या समाजाला तरणोपाय नाही . अशे नमूद करावेसे वाटते . एकदा संघटनांची मजबूत भांडणी ग्रामीण व शहरी समाज भंडाव सर्व राजकीय नेतृत्व परिपक्व झाल्यावर कोणत्याही समाजाची आमच्याकडे वाकडी नजर करण्याची हिम्मत होणार नाही आणि आम्ही शेती शिक्षण , आरोग्य आणि राजकीय या सर्व आघाड्यांवर नेत्रदीपक आही भरीव कामगिरी करून आदिवासी समाजाला इतर पुढारलेल्या समाजाबरोबर विकासाची सांगड घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.