लेख

" ९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस "

श्री नामदेव गंभिरे

संयुक्त सर्वसाधारण आमसभेत दि.२३ डिसेंबर १९९४ रोजी पारित केलेल्या ठराव क्र.४९-९१४ प्रमाणे ९ ऑगष्ट हा आतररस्त्रिय दिवस म्हणून जाहीर करण्यात आला.आदिवशी हे या भूमीचे मुल रहिवासी आहेत , निसर्गात राहणारे व निसर्गातील घटकांचा उपयोग करून जीवन जगणारे आहेत . जंगलातील संपत्तीचे संवर्धन करून जगण्याचे नेसर्गिक संस्कार त्यांच्या एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे सोपविले जातात . भारतातील नेसर्गिक साधनसंपत्ती गेली हजारो वर्ष त्यांनी जपली, पर्यावरणाचा समतोल बिघडू दिला नाही . आशा जमाती टिकविणे व त्यांना त्यांच्या राहत्या जागी नेसर्गिक स्रोत उपलाभ्द करून देणे प्रत्येक देशाचे कर्तव्य आहे . या भावनेतून पेरीत होऊन जागतिक संघटनेने (उनो ) ने सन १९९४ ते २००४ हे दशक जागतिक आदिवासी दशक म्हणून घोषित केले त्यामुळे ९ ऑगष्ट हा दिवस जगभर जागतिक आदिवशी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.तद नंतर कार्यक्रमाची आवश्यकता पाहून २००५ ते २०१५ हे दशक जागतिक आदिवासी दशक म्हणून पुन्हा घोषित करण्यात आले या पार्श्व भूमीवर महाराष्ट्र पुणे, नाशिक, ठाणे, नंदुरबार, धुळे, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिह्ल्यातील विविध आदिवशी संघटना सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करून तशेच आदिवासी क्रांतिकारकाचे शौर्याचा जयजयकार करीत गौरवदिन साजरा होत आहे.महाराष्ट्रा शिवाय गुजरात राज्यात सागबारा जी.नर्मदा शेटा उद्याय्पूर, बोडली जी.बडोदा,झागादिया, व्यारा,सोनगड येथील आदिवासी एकता परिषद व भिल्लीस्थान व इकास मोर्चा मध्यप्रदेशातील खट्टी जी.वडवणी,बगल्लाल जी.देवास येथील आदिवासी विकास संघटना, राजस्थानातील उदयपुर येथी भिल्ल महासंघ,आस्था संस्था छत्तीसगड मधील आदिवासी विकास परिषद, धरखंड मधील रंचीची आदिवासी धरम परिषद,याशिवाय देशात दिल्ली, त्रिपुरा, नागाल्यान्ड,प.बंगाल,आसाम,अरुणाचल प्रदेश आदी ठिकाणी ९ ऑगष्ट हा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

आज जगभर आदिवासी जल,जंगल आणि जमिनीचे,नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करत असताना जागतिकीकरणाच्या,विकासाच्या नावाखाली त्याच्या संस्कृतीवर, भाषेवर जल,जंगल, जमिनीवर,समूह जीवनावर आक्रमण होत आहे.त्यामुळे या देशातील मुल निवासी आदिवासींची संस्कृती धोक्यात आली असून त्यांचे निसर्गाशी असलेले नाते संपुस्ठात येत आहे .आपल्या वयाक्तीत स्वार्थासाठी आदिवासींनी कोणाचेही शोषण केले नाही.तुमच्या भोगवादी संस्कृतीने गोबल वार्मिंगने संपूर्ण सजीव श्रुस्तीलाच धोक्यात आणले आहे. हरी व आयु दुस्परीनाम परीशेदेतून विनोने एक महत्वपूर्ण निर्णय जगापुढे मांडला आहे तो असा, जर नैसर्गिक जीवश्रुस्ती वाचवायची असेल तर ति कायदे करून वाचणार नाही,ति आदिवासींच्या ताब्यात द्या.ते निसर्गावर जेवढे प्रेम करतात तेवढ अन्य कोणावरही करत नाहीत.तेच इथला निसर्ग वाचू शकतात हा आतिशय महत्वाचा निर्णय आहे.यातून आदिवासी जमाती किती महत्वाच्या आहेत हे जगाला ध्यानात द्यावे लागेल . नैसर्गिक संसाधनाचा दुरुपयोग न करता त्यांचे संवर्धन करणे तसेच पूर्वजांपासून चालत आलेले नैसर्गिक साधनांची विरासत भावी पिढीकडे सोपविणे,हे आदिवासी संस्कृतीचे महत्वाचे वैशिठ्य त्यात आहे. आदिवासींची एक पारंपारिक धारणा आहे ति म्हणजे,हि पृथ्वी माझी नाही,तर मी पृथ्वीचा आहे म्हणजे तो या धरतीला जन्मदाती मानतो तिचे रक्षण आणि संवर्धन करणे स्वताचे कर्तव्य मानतो.मातेला आणि मातीला तो सारख्याच प्रतिष्ठेने वागवितो पृथ्वी वाचली तरच त्यावरील जीवसृठी वाचेल,हि जाणीव आदिवासी साम्हुहानी जपली आहे.इतर समूहांना याची जनी व्हावी,देशातील राज्य वेवास्थेला जनी व्हावी म्हणून हा विश्व आदिवासी दिवस साजरा होयला हवा.

आतररस्त्रियस्थरावर आदिवासी समूहाच्या हक्कासाठी दोन प्रमुख मसुदे आहेत. आतररस्त्रिय राम संघटनेच्या (आय .ओ .एल )संकेत क्र.१६९ (१९८९)तशेच संयुक्त रात्रासंघांने september २००७ मध्ये मंजूर केलेला आदिवासी समूहाचा कायदा परंतु या दोन्ही मसुद्याबाबत भारत सरकारने भारतात आदिवासी लोक नाही असे नोंदविले आहे. भारतीय राज्यघटनेत आदिवासी शब्दाची नोंद नाही भारताच्या संविधानात ५ वी ६ वी सूची असूनही त्याची अमलबजावणी करता उल्लंघन केले जाते.पेसा(पी.इ. एस.एं)सारखे आदिवासींच्या हक्काचे कायदे होऊनही त्याची अमलबजावणी होणे एवजी पायमल्ली तुडवले जातात . भारतीय स्वातंत्र्यात आदिवासी क्रांतिकारकांचा गौरवशाली इतिहास नोंदविला गेला नाही.आद्याक्रांतीवीर राघोगी भंगारा,खाज नाईक, तंट्याभिल,बिरसा मुंडा,कोवरासिंघ वसावा,बाबुराव शेडमाके,सिदुकानह या व यासारख्या हजारो क्रांतिकारकांनी देशभक्तानी ब्रिटिशाविरूढ लढा दिला.या देशातील अनेक संस्थानिक ब्रिटिशाना शरण गेलेले परंतु आदिवासी समूहांनी मात्र आपल्या जल,जंगल आणि जमिनींसाठी ब्रिटिशाशी अखेर पर्यंत लढा दिला. जव्हारचे मुकणे राजांचे संस्थान देशाच्या स्वातंत्र्य नंतर विलीन करण्यात आले. १९५७ ला रानादुल्ला खान नावाच्या मुघल बादशाहने ४०० महादेव कोळ्यांच्या कात्तारी करून शिवनेरी किल्ल्यावर मुद्कांचा ढीग रचला.शिवरायांच्या स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या या देशभक्तांच्या बलिदानाचा ऐतिहास लबाड इतिहासकारांनी लिहिला नसला तरी आजही शिवनेरी किल्ल्यावरचा कोळी चौथरा देशातील आदिवासींसाठी प्रेरणा दायी आहे.राजस्थानात मानगड येथे १५०० आदिवासींना एकाच वेळी गोळ्या घालून ठार केले. हे जालियानवाला बाग हत्याकांदापेक्षाही अमानुष हत्याकांड होते. स्व स्वातंत्र्याच्या या लढ्यात मुघल, इग्रज, जमीनदार,शेठ,सावकार आणि आमचे शोषण करणारे,अत्याच्यार करणार्यांच्या विरोधात आदिवासी देशभक्तानी निष्ठेने लढा. त्यांचा हा गौरवशाली इतिहास इथल्या प्रस्थापतानी लिहिला नसला तरी इथल्या मातीला तो माहित आहे मातीच आता माणसे पेटविल.

आज जगभरातील आदिवासींनी आपले आस्तित्व टिकविण्यासाठी बोली , संस्कृती , समूहजीवन , सहकार्याची , प्रेमाची , माणुसकीची मुल्ये जगातला देण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.

जगभर आदिवशी गौरव दिन साजरा करताना भारतीय आदिवासींच्या सांस्कृतिक अस्मिता जपणे महत्वाचे आहे.९ ऑगस्टला आदिवासी लोककला,नाट्य,चित्र, शिल्प या कलांचे सादरीकरण, प्रदर्शन भरवायला हवे. शहरात चौका-चौकात, खेदापाध्यात या कलांचा आणि त्या सदर्कार्नार्यांच्या पारंपारिक भवनाचा आदर करणे गरजेचे आहे.आदिवासी क्रांतिकारकांचा गौरवशाली इतिहास जगापुढे मांडून त्या क्रांतिकारकांच्या निष्ठेचा आणि प्रेरणाच सन्मान होयला हवा. आदिवासी बोली या प्राचीन आहे, या बोलीतील लोकनाट्या, लोकगीते,लोकसाहित्य तसेच आदिवासी बोलीतील साहित्याला प्रोसहान मिळेल आशा उपक्रमाची आखणी होयला हवी. याबोली जपण्यासाठी,शिकविण्यासाठी राज्य आणि केंद्राची योग्य आमल्बाजावणी होयला हवी

या विश्व आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने भारतातील तसेच महाराष्ट्रातील आदिवासी समूहांच्या इथल्या लोकशाही व्यवस्थेकडून काही अपेक्षा आहे त्या पूर्ण होयला हव्यात.

१) भारतीय राज्यघटनेतील scheduled Tribes या शब्दासाठी आदिवासी शब्दाची नोंद होयला हवी.

२) भारताच्या स्वतंत्र नंतर देशभरातील आदिवासींचे आदिवासीपण नास्थकरून त्यांचे वनवासीकरण आणि त्याद्वारे देशभरातून तसेच परदेशातून विकासाच्या नावाखाली निधी उभा करण्याच प्रकार राजरोसपणे चालू आहे तो थांबविणे.

३) आदिवासी मजुरांचा जनावरांसारखा लिलाव थांबविणे हा लिलाव सहरातील bus stand, भर चौकात, रत्यावर चालतो, स्वातंत्र्यानंतरही या देशात आदिवासींचा जनावरांसारखा लिलाव होत असेल तर ति गोष्ट या देशातील सर्वाधिक आमनावीय आहे.

४) ४) आदिवासी लोककला ठेकेदारांच्या कचाट्यात सापडल्या असून त्यांचे नैसर्गिक सौंदर्य नाश होऊन त्यात व्यापारि दृस्तीकोनेन निर्माण झाला आहे.तो प्रथम थांबवायला हवा कारण आदिवासींच्या कला या त्यांच्या आनंदासाठी आणि धर्तीच्या पूजेसाठी असतात.

५) आदिवासी हे या भूमीचे मुलनिवासी असल्याने त्यांच्या जल,जंगल आणि जमिनींवर त्यांचा पारंपारिक हक्क आहे.तो त्यांना देऊन स्वतंत्र आणि स्वयात्व जिल्ह्यांची, तालुक्यांची निर्मिती होयला हवी.घटनेतील ५व्य व ६व्य सूचीतील त्यांच्या स्वयात्वेतेचा हक्क त्यांना मिळायला हवा .

६) गेल्या ६४ वर्षानान्त्र्रही आदिवासी पाड्यांपर्यंत प्राथमिक शिक्षण पोहोचले नाही.उदा.नंदुरबार जिल्ह्यात अतिदुर्गम भागात झापी,सिंधी, फलई,खडकी,भादल या गावात स्वतान्त्र्यानंतर प्राथमिक शाळा भरलेली नाही.या सारख्या महाराष्ट्रात असंख्य गावात प्राथमिक शिक्षण पोहोचायला हवे.

७) आदिवासींच्या शैक्षणिक विकासासाठी महाराष्ट्रात स्वातंत्र् आदिवासी शिक्षण आयोगाची स्थापना करण्यासाठी मागणी समाजाकडून होत आहे,ती पूर्ण होयला हवी .

८) देशभर होत असलेले आदिवासींचे धर्मांतर रोखायला हवे .

९) महाराष्ट्रात सरकारच्या सेवेतील एक लाख पाच हजार पडे बोगस आदिवासींनी बळकावले आहे. हा या राज्यातील आदिवासींवरील सर्वात मोठा अन्याय आहे.आमचा हक्क आम्हाला द्या आशी महाराष्ट्रातल्या आदिवासींची १९९५ पासूनची मागणी आहे. ती या दिनाच्या निमित्ताने सरकारन पूर्ण करायला हवी.

१०) आदिवासींना मुख्या प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागाची स्थापना करून त्यांच्यावर वर्षाला ४८८४ कोटी रुपये खर्च केला जातो. परंतु हा मुख्य प्रवास म्हणजे नेमके काय ? आदिवासींना काय हवे आहे ? हे त्यांना विचारायला हवे.त्यांच्या गरजा आणि शामातांचा विचार करायला हवा.

११) आदिवासींचा सर्बंगीण विकास करताना शिक्षण,क्रीडा,कला,साहित्य,संगीत, उद्योगधंदे, तंत्रज्ञान,औद्योगीकरण,शेती,प्रसारमाध्यमे अशा सर्वांगीण विकासाच्या विविध प्रवाहांत त्यांना संधी उपलब्ध करून द्यायला हवी.

१२) आदिवासींच्या काही पारंपारिक,मानवतावादी धारणा आहेत.त्या जपायला हव्यात. उदा.पहिली बेटी धनाची पेटी सहकार्याची भावना जपणारी “लाहे” पद्धत्ती.हि पृथ्वी माझी नाही तर मी पृथ्वीचा आहे .समाधान,सजीव श्रुतीवरील निष्ठा आणि त्यांची प्रतिष्ठा इ.विश्व आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने या त्यांच्या अपेक्षा पूर्ण होयला हव्यात.संबंध मानव जातीने या समूहांना त्यांच्या मानवतावादी परंपरांना,मूल्यांना,त्यांच्यातील आदिमातेला जपायला हवे.संबंद देशाने हा गौरव दिन साजरा करायला हवा .

आपल्या बोलीला आदिवासी माणूस आपली दुसरी आईच मानतो.जल्म देणारी आई आपल्या शरीराचे भरण पोषण करते तर बोली आपल्या आनुभूतीच,व्याक्तीमत्वाचे भरण- पोषण करते . आदिवासी बोली हा आद्य मानवाची भाषा आहे.त्यानेच भाषेचा पहिला शोध लावला.शिवाय या पृथ्वीच्या पाठीवरची त्यांची धर्मपूर्व संस्कृती,धार्मिक जीवन,धर्मतत्वे,धरम संस्कार इतल्या माणसाना माणसांवर,पशुपाक्षांवर,निसर्गावर प्रेम करायला शिकवतात.या सर्वांसह आदिवासींनी एकत्र याव.या देशातल्या स्वतंत्र दिनासारखा,प्रसासात्तक दिनासारखा विश्व आदिवासी गौरव दिन साजरा करावा आशी अपेक्षा करून संबंध जगभरातील आदिवासींना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा ...



 नामदेव गंभिरे