आदिवासी समाज कृती समिती, महाराष्ट्र, पुणे गेली ३० वर्षे सतत आदिवासी समाजासाठी प्रबोधन, शिक्षण, प्रशिक्षण, संघटन, न्यायालयीन लढे, तरुणांना मार्गदर्शन अशा विविध विषयावर काम करत आहे.
या वर्षी आदिवासी समाज कृती समितीच्या वतीने समाजातील विविध घटकांपर्यंत पोहचता यावे आणि आदिवासी प्रथा, परंपरा, रूढी, संस्कृती, साहित्य, कथा, कविता, मतमतांतरे, प्रवाह, शासकीय योजना यांचा एकत्रित परिचय आदिवासी व इतर समाजासाठी व्हावा या उद्देशाने जुलै/ऑगस्ट २०१८ पासून ”आदिवासी संवाद” या नावाने मासिक प्रकाशित करण्यात येणार आहे.
या मासिका मध्ये आदिवासी समाजाचे स्वरूप प्रतिबिंबित होइल. तसेच अनेक नवोदित लेखक, कवी यांना “आदिवासी संवाद” हे प्रोत्साहन व प्रेरणा देईल.
या मासिकातून आदिवासी समाजातून उल्लेखनिय कामगिरी केलेल्या तरुण/ तरुणींचा समाजास परिचय करून दिला जाईल व प्रेरणा देईल.
आदिवासी समाजातील अधिकारी, पदाधिकारी, नोकरदार, गावो-गावातील सरपंच/उपसरपंच, पोलीस-पाटील व ग्रामपंचायत सदस्य व आदिवासी समाजाच्या विकासाची तळमळ असणाऱ्या विविध सेवाभावी संस्था, आश्रमशाळा, वसतीगृहे अशा सारखे कोणीही सभासद होवू शकते.
वार्षिक सभासद फी रु. ६००/- फक्त (घरपोच)
किरकोळ विक्री रु. ५०/- फक्त
श्री. सीताराम जोशी
“आदिवासी संवाद”
संपादक मंडळाच्या वतीने