आदिवासी समाज कृती समितीने सामाजिक बांधिलकी जपत सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा भोर तालुक्यातील ७ कातकरी वस्त्यावर आदिवासी कातकरी कुटुंबाची दिवाळी गोड केली.
या उपक्रमात भोर तालुक्यातील आंबवडे, टीटेघर, म्हाकुसी, नाझरे, करंजे, कासुर्डी, वडगाव या कातकरी वस्त्यावर आदिवासी कातकरी कुटुंबाना दिवाळीच्या फराळाचे वाटप आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष श्री. नामदेव गंभिरे, कार्याध्यक्ष श्री. रामचंद्र शेलकंदे, उपाध्यश श्री. गंगाराम सांगडे व श्री. दुंदा मोरे, तसेच संचालक श्री. किसान भोजने, श्री. खेवजी भोईर, श्री. लक्ष्मण भालेकर, श्री. प्रकाश जंगले व श्री. बाळासाहेब रेंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्री. नथू पवार (अध्यक्ष्य हुतात्मा नाग्या कातकरी संघटना भोर, ता. भोर) यांनी आंबवडे, टीटेघर, म्हाकुसी, नाझरे, करंजे, कासुर्डी, वडगाव या कातकरी वस्त्यामधील सामाजिक कार्यकर्ते अनुक्रमे श्री. विजय मुकणे, श्री. दीपक पवार, श्री. गोविंद जाधव, श्री. काळू कारेकर, श्री. गंगाराम मुकणे, श्री. भरत पवार, श्री. मंगेश वाघमारे यांच्या सहकाराने आयोजन केले होते.
या प्रसंगी प्रत्येक कातकरी वस्तीसाठी शासनाकडून त्या त्या वस्त्या पर्यंत रस्त्याचे काम, कातकरी बांधवाना मासेमारीसाठी, नदीकाठी संरक्षक भिंत तसेच तलावच्या बाजूने संरक्षक भिंत, बेरोजगार युवकांना तहसीलदाराकडून जातीचे दाखले, दारिद्र रेषेखालील कुटुंबाना रेशिनिंग कार्ड, अश्यामागण्या श्री. नथू पवार यांनी आदिवासी समाज कृती समितीच्या पदाधिकार्यांच्या निदर्शनात आणल्या.
या मागण्यासाठी आदिवासी समाज कृती समिती कडून सहकार्य करू असे आश्वासन देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.